Ad will apear here
Next
मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी
मुलांना चांगल्या सवयी लावल्या, तर त्यांचे आयुष्य घडते. चुकीच्या सवयींमुळे आयुष्य बिघडू शकते. म्हणून चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवणे व चुकीच्या घालवणे हे महत्त्वाचे असते. ते कसे साध्य करता येईल, याबाबत मनोज अंबिके यांनी ‘मुलांसाठी १०१ प्रभावी सवयीं’मधून मार्गदर्शन केले आहे. यातील १०१ सवयींविषयी बोलताना प्रत्येक सवय कशी लावावी, हेही सांगितले.

मोठी माणसे काय सांगतात यापेक्षा कशी वागतात, यावरून मुले शिकत असल्याने मोठ्यांचे वागणे प्रथम तपासावे, असा सल्ला देताना सकाळी उठल्यावर अंथरुणाची घडी घालण्याच्या सवयीपासून श्रीगणेशा केला आहे. तीन मिनिटे दात घासण्याची सवय, ताट स्वच्छ करणे, व्यवस्थितपणा, मैदानावर खेळणे, कला जोपासणे, नकार पचविणे, स्वतःचे मत मांडणे, प्रश्न विचारणे, व्यवहारज्ञान शिकणे, रोज लवकर उठण्यापासून दैनंदिन कामे वेळेत व नियमित करणे अशा अगदी छोट्या-छोट्या वाटणाऱ्या; पण सुयोग्य व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आवश्यक सवयी यात आहेत.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पाने : २१६
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXABT
Similar Posts
यू-ट्यूबवर हिट झालेल्या ‘मधुराज् रेसिपी’ पुस्तकरूपात उपलब्ध पुणे : यू-ट्यूबवर हिट झालेल्या ‘मधुराज् रेसिपी’ आता मराठी वाचकांना पुस्तकरूपानेही उपलब्ध झाल्या आहेत. मधुरा बाचल यांनी लिहिलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींच्या मराठी पुस्तकांचे पाच ऑक्टोबर २०१८ रोजी पुण्यात दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री
मनाची शक्ती कशी वापराल ‘तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो,’ असा संदेश देणारे हे मनोज अंबिके यांचे हे पुस्तक मनाचे कार्य, मनःशक्तीचा योग्य वापर आदींसंदर्भात मार्गदर्शन करते. मन कुठे असतं?, माझे मन कसं काम करतं?, दिसतं तसं नसतं, अशी जन्म घेते इच्छाशक्ती, जसा विश्वास तसेच फळ, पण
स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी ‘स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी’ या पुस्तकाचा परिचय
मधुराज् रेसिपी स्वयंपाक करताना पदार्थ रुचकर करण्याबरोबरच व्यवहार ज्ञानही महत्त्वाचे असते. पूर्व नियोजन केल्यास स्वयंपाक करताना घाईगडबड होत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मधुरा बाचल यांनी ‘मधुराज् रेसिपी’ या पुस्तकातून विविध शाकाहारी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language